Headlines

उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेची वालाव मध्ये कार्यानुभव कार्यशाळा…

⚡कुडाळ ता.२२-: डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे ता. कुडाळ यांच्यातर्फे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम सुरू असून या विद्यालयातील विद्यार्थी गावात जाऊन ४ महिने कामाचा अनुभव घेतात. वालावल मध्ये माठवाडी, गावधड, चौधरीवाडी, कद्रेकरवाडी , या ठिकाणी भाजी लागवड, काजू लागवड, सुपारी लागवड असे उपक्रम घेण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
अशा उपक्रमातून उद्यानविद्या महाविद्यालयातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव येतो. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद होत असल्यामुळे गावातील कामाचे स्वरुप लागवडीचे प्रत्यक्ष अनुभव येतो. या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये फूड सायन्स, व्हिजिटेबल सायन्स ,सुशोभीकरण ,ब्रीडिंग, कीटकशास्त्र, पॅथॉलॉजी अशा विषयांचा समावेश आहे .
या कार्यशाळे मध्ये मयुरेश दळवी (आंब्रड), अजित म्हसकर (रानबांबुळी) , स्मित कोळेकर (चिपळूण) , मनीष कमेरिया (राजस्थान), सोनू कुमार (बिहार) , उज्वल तोंडवळकर (तोंडवळी) यांनी सहभाग घेतला. आज वालावल लक्ष्मीनारायण मंदिरात बगीच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करून त्यांच्या मार्फत आकर्षक फुलझाडे लावली जात आहेत. या उपक्रमाचे मंदिर व्यवस्थापक कमिटी मार्फत कौतुक करण्यात आले. या वेळी देवस्थान कमिटी सदस्य संदीप साळसकर, व्यवस्थापक आकाश मठकर, गणपत कवटकर, आनंद चौधरी, कुलदीप खानोलकर, समीर चौधरी, संदेश जुवेकर, इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. .

You cannot copy content of this page