Headlines

कुडाळ नगरपंचायतीत उद्या ‘एकल महिला दिवस’…

⚡कुडाळ ता.२२-: महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या निर्देशानुसार २३ जून, २०२६ रोजी कुडाळ नगरपंचायत कार्यालयात ‘एकल महिला दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त एकल महिलांसाठी (विधवा निराधार) शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती, मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार असून, एकल महिलांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेऊन राज्याच्या प्रस्तावित एकल महिला धोरणासाठी अभिप्राय संकलित केला जाणार आहे. शहरातील सर्व एकल महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कुडाळ नगरपंचायतीने केले आहे

You cannot copy content of this page