…आणि छत्रपतीच्या नवीन पुतळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

⚡कणकवली ता.११-:
कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नवीन छत्रपतींचा पुतळा बसविण्यात आल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता प्रशासकीय यंत्रणा दक्ष झाली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन बसवण्यात आलेल्या पुतळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गेले चार दिवस चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून दंगल नियंत्रण पथकाबरोबरच पोलीस अधिकारी देखील तैनात करण्यात आले आहेत. सर्विस रोडच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अज्ञातानी बसविल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 24 तास पुतळ्याच्या अवतीभवती नजर ठेवण्यासाठी प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे आज दुपारपासून बसविले आहेत. त्यामुळे या कॅमेऱ्याची मदत पोलिसांना होणार असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी हे कॅमेरे उपयुक्त ठरणार आहेत

You cannot copy content of this page