नांदगाव,असलदेत उस्फुर्त प्रतिसाद
⚡कणकवली ता.११-: एकात्मिक बाल विकास प्रकल्प कणकवली अंतर्गत ० ते ६ वयोगटातील मुलांची आधार कार्ड नोंदणी मोहीम हाती घेतली असून नांदगाव तिठा असलदे शाळा क्रमांक ४ येथे नांदगाव येथील ६ अंगणवाडी व बेळणे खुर्द अंगणवाडी येथील एकूण ५९ मुलांची आधार कार्ड नोंदणी नव्हती या मोहिमेत या पैकी सहभागी होत ४० मुलांची आधार कार्ड नोंदणी केली आहे.यामुळे आधार कार्ड साठी तालुका ठिकाणी जावे लागणार नाही.
यावेळी असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, अंगणवाडी मुख्य सेविका श्रीमती परुळेकर,व सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी कर्मचारी वर्ग व पालक उपस्थित होते.
तसेच असलदे ग्रामपंचायत येथे ही या मोहिमेअंतर्गत आधार कार्ड नोंदणी केली आहे.
यावेळी असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब, ग्रामसेवक आर.डी. सावंत, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी पालक उपस्थित होते.
