⚡कणकवली ता.११-:
आशिये वरचीवाडी येथील भजनी बुवा चंद्रकांत दाजी चव्हाण( वय 63) यांचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
लिंगमाऊली प्रासादिक भजन मंडळाचे प्रसिद्ध भजनी बुवा म्हणून जनमाणसात त्यांची ओळख होती. दिलदार माणूस, हसतमुख चेहरा, प्रेमळ व्यक्तिमत्वाने त्यांनी अनेकांना आपलेसे केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, दोन विवाहित मुली व नातवंडे असा परिवार आहे.
