निगुडे-रोणापाल रस्त्यावरील झाड हटविले

वाहतूक सुरळीत : विद्युत पुरवठाही पूर्ववत

⚡बांदा ता.१२-: मुसळधार पावसामुळे निगुडे-रोणापाल रस्त्यावर निगुडे ग्रामपंचायत समोर एक भलं मोठं झाड पडून वाहतूक विस्कळीत झाली होती. सकाळची वेळ असल्याने महाविद्यालयात जाणारी एसटी व इंग्लिश मीडियमच्या बसेस अन्य मार्गाने हलवाव्या लागल्या. निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी तात्काळ दखल घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने सदरचे झाड बाजूला केले.

तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका निगुडे गावाला बसला. ग्रामपंचायत समोर रस्त्यावर झाड उन्मळून पडून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. तसेच विद्युत ताराही तुटून पडल्या होत्या. तात्काळ याची दखल उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी घेत बांदा कनिष्ठ अभियंता अनिल यादव यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर महावितरणचे ठेकेदार सुनील राऊळ यांनी घटनास्थळी येत तासाभराच्या आत सर्व यंत्रणा सुरळीत केली. तसेच गावातील वायफायची केबलही तुटण्यात आली होती ती दुरुस्त करण्यात आली.
यावेळी महावितरणचे वायरमन श्री. कुडव, सामाजिक कार्यकर्ते वसंत जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष राणे, लहू जाधव तसेच ग्रामस्थ विश्राम जाधव, सिद्धेश म्हाडगूत, बबली जाधव, गौतम जाधव, दादू म्हाडगुत आधी उपस्थित होते.

You cannot copy content of this page