तत्पर सेवेसाठी वीज कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप

केळुस उपसरपंच तथा पत्रकार आबा खवणेकर यांचा स्तुत्य उपक्रम

⚡वेंगुर्ले ता.१२-: या वर्षी सुरूवातीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सुरूवात केल्याने झाडे मोडून तसेच उन्मळून वीज तारांवर पडून विदयुत वाहिन्या तुटल्याचे प्रकार काही ठिकाणी झाले आहेत.तर काही ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे वीज बंद होण्याचे प्रकार केळुस गावात होत आहेत.अशा प्रकारामुळे बऱ्याच वेळा वीज पुरवठा बंद राहत असल्याने ग्राहकांना व गावातील व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो.

तसेच केळुस व आंदुर्ले गावातील वीज मंडळाचे कर्मचारी मनोज सडवेलकर व वैभव पिंगुळकर हे दोघेही गावात प्रामाणिकपणे काम करीत आहेत.मात्र पावसा मुळे त्यांना काम करण्यास शक्य होत नसल्याने ते तातडीने काम करू शकत नाही.या पार्श्वभूमीवर त्यांची रेनकोटची अत्यावश्यकता लक्षात घेऊन दोन्ही वायरमन मनोज सडवेलकर व वैभव पिंगुळकर यांना केळुस गावचे उपसरपंच व पत्रकार तसेच कोकणचा तडाखा न्यूजचे संपादक आबा खवणेकर यांनी चांगल्या दर्जाचे रेनकोट प्रदान करून जनतेची कामे तत्परतेने करावी यासाठी गरज ओळखून ती पुर्ण केली आहे.

यावेळी केळुस गावातील प्रसिद्ध रिक्षा चालक सचिन मुणनकर,रिक्षाचालक बाबल वेंगुर्लेकर,बांधकाम व्यावसायिक गणेश नाईक,रूपेश मुणनकर यांच्या उपस्थितीत वायरमन मनोज सडवेलकर व वैभव पिंगुळकर यांना श्री खवणेकर यांनी  रेनकोटचे वाटप केले.तर उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांच्या या दातृत्वाबद्दल वायरमन मनोज सडवेलकर व वैभव पिंगुळकर या दोन्ही कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page