Headlines

कट्टा सेवांगणच्यावतीने आषाढी निमित्त दिंडी

⚡ओरोस ता.१२-: बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे आषाढी एकादशी निमित्त कट्टा एस्टी स्टँड ते विठ्ठल मंदिर कट्टा अशी दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये कट्टा परिसरातील कट्टा गुरामवाडी व कुणकवळे शाळेतील मुले व प्रामुख्याने महिला पालक
सहभागी झाले होते.

या दिंडीमध्ये कुमार श्राव्य झाटये यानी साकारलेला विठूराया, कुमारी तनिषा म्हाडगुत यानी साकारलेली मुक्ताई साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. कुणकवळे येथील मुलानी खास वारकरी पेहराव केला होता. पाऊस असूनही मुले उत्साहाने व आनंदाने नाचत होती. पेंडूर येथील प्रसिद्ध गायक व कला दिग्दर्शक भारत पेडूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभंग गायनाचा शुभारंभ झाला. सर्व प्रथम भारत पेंडूरकर यानी यानी गायलेल्या गणेश वंदनाने सुरुवात झाली.
गीता नाईक यानी “अमृताहुनी गोड” व “धरीला पंढरीचा चोर” हे अभंग, मिथीला नागवेकर यानी “सुंदर ते ध्यान व वृक्षवल्ली अम्हा सोयरी” हे अभंग, वैष्णवी लाड यानी “विठू माऊली तू ” प्रियांका भोगटे यानी “चद्रभागेच्या तिरी ” दीपक भोगटे यानी “कानडा राजा पंढरीचा” नांदोसकर गुरुजी यानी ” मुकेपणा आज माझा ” हे अभंग गायन केले. भारत पेंडूरकर यानी सामुदायीक पणे गायलेल्या जय जय रामकृष्ण हरी या भजनाने व त्यानंतर सुजाता पावसकर यांच्या पसायदानने कार्यक्रमाची सांगता झाली.
बाळकृष्ण गोंधळी व सुजाता पावसकर यानी दिंडी व अभंग गायन याचे संपूर्ण नियोजन केले. या उपक्रमात किशोर शिरोडकर, बापू तळवडेकर, अरविंद शंकरदास, भारत पेंडूरकर, अरविंद पेंडूरकर, श्री पवार, मिथिला नागवेकर, वैष्णवी लाड, गीता नाईक, प्रियांका भोगटे, स्नेहा पावसकर, धुत्रे बाई, मधुरा माडये, गौरी झाट्ये, संदेश वाईरकर व शिवण विभागाच्या विद्यार्थिनी
विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page