ओरोस ता.१२-:
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा मालवणच्या वतीने संघटनेच्या सभासदांच्या १० वी व १२ वी उत्तीर्ण पाल्यांचा सत्कार सोहळा नुकताच कट्टा नं १ या शाळेत तालुकाध्यक्ष सुयोग धामापूरकर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला .
कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सचिव जीवन हजारे यांनी केले. विद्यार्थांना शैक्षणिक जीवनात दिशा ठरविण्यासाठी करिअर मार्गदर्शन व स्पर्धा परिक्षा अभ्यासकेंद्र सुरु करण्या संदर्भात संघटनेच्यावतीने प्रयत्न करण्यात येणार असे, मत मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी मान्यवरांनी आपले अनुभव कथन केले. तसेच मुलांनी कष्ट, चिकाटी, जिद्द यांचा अवलंब करून पुढील यश संपादन करावे, असेही मत व्यक्त केले.
यावेळी व्यासपिठावर तालुकाध्यक्ष सुयोग धामापूरकर, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, जिल्हाध्यक्ष नितिन कदम, नारायण नाईक, जेष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण, पतपेढी अध्यक्ष दादा जांभवडेकर, जिल्हा शिक्षक नेते नंदकुमार राणे, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, महिला जिल्हा सरचिटणीस वैभवी कसालकर, मालवण तालुका शिक्षक नेते मंगेश कांबळी, मालवण पतपेढी संचालक राजेंद्र प्रसाद गाड, कार्याध्यक्ष रुपेश गरुड, प्रवक्ता नवनाथ भोळे, महिला आघाडी सचिव भाग्यश्री वाडकर, आदी उपस्थित होते.
यावेळी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला . यावेळी बहुसंख्येने सभासद, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रमिता तांबे यांनी केले. तर आभार नवनाथ भोळे यांनी मानले.
