राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेसाठी जोरदार चुरस

१३ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात

⚡ओरोस ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची होणार आहे. विद्यमान संचालकांचे सहकार वैभव पॅनल विरोधात श्री रवळनाथ परिवर्तन पॅनल यांच्यात ही लढत होत आहे. एकूण १५ संचालक निवडून द्यायचे आहेत. यातील दोन संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. तर उर्वरित १३ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात आहेत. केवळ ओबीसी मतदार संघ वगळता एकास एक अशी थेट लढत होणार आहे.

जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. यासाठी २३ जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. एकूण ३७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. १५ जागांसाठी ३७ अर्ज आल्याने यावर्षी राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्था निवडणुकीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांतील वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. २४ जून रोजी अर्ज छाननी करण्यात आली. ११ जुलै रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ठेवण्यात आली होती. २४ जुलै रोजी मतदान घेण्यात येणार असून २५ रोजी मतमोजणी होणार आहे.

You cannot copy content of this page