पाच जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर:ताबा सुटल्याने वाहनाचा अपघात; कारचे मोठे नुकसान,..
⚡सावंतवाडी ता.२२ -:
सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथे थार कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नेमळे परिसरातून प्रवास करत असताना थार कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. अपघाताची तीव्रता एवढी होती की वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले व उपचारासाठी रुग्णालयात हलविले. या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.
