Headlines

वक्तृत्व स्पर्धेत रामचंद्र शिरोडकर प्रथम

⚡वेंगुर्ले ता.१६-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून दाभोली-तळेथर शाळेत शिक्षणप्रेमी राजाराम कांबळी याच्या पुढाकाराने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत रामचंद्र शिरोडकर (प्रथम), निधीर राजापूरकर (द्वितीय) व राम मांजरेकर (तृतीय) यांनी क्रमांक पटकाविले.

Read More

गणेश चतुर्थीपूर्वी आम सभा घ्या…

रुपेश राऊळ यांची मंत्री केसरकराकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.१६-: गेल्या पाच वर्षांत मंत्री दीपक केसरकर यांनी एकदाही आमसभा घेतली नसून, गणेशचतुर्थी पूर्वी तरी ही आमसभा घेण्यात यावी अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

Read More

मतदारसंघात मंत्री होऊन आलेले दिपक केसरकरांना पडला जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांचा विसर…

रूपेश राऊळ:चांदा ते बांदा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आसल्याच केला आरोप.. ⚡सावंतवाडी ता.१६-: मंत्री होऊन मतदारसंघात आलेले दिपक केसरकर यांना जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्न सोडविण्याचा त्यांना विसरल पडला असल्याची जोरदार टिका आज आयोजित पत्रकार परिषदेत रूपेश राऊळ यांनी केली. दरम्यान शेतकऱ्याचे झालेले नुकसान भरपाई पंचनामा केला की नाही याचा साधा आढावा देखील घेतला नाही. त्यामुळे केसरकर…

Read More

कोळोशी ग्रामपंचायतीमार्फत रक्तदान,नेत्र तपासणी शिबिर

⚡कणकवली ता.१६-:भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कोळोशी,सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग व एच.डी. एफ.सी बँक कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.यावेळी २० रक्तदाते व ३३ गरजू ग्रामस्थांनी नेत्र तपासणी करून घेतली.या शिबिरास ग्रामीण व छोटा गाव असूनसुद्धा उत्तम प्रतिसाद मिळाला.या रक्तदान शिबिरात उपनिरीक्षक राजकुमार मुंढे यांनी स्वतः रक्तदान करत समाजासमोर…

Read More

मळगाव रस्त्यावर बेवारस उभ्या असलेल्या ट्रकमधील बेकायदेशीर दारू जप्त…

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ३८ लाख ७६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त ⚡बांदा ता.१६-: सातार्डा -सावंतवाडी रस्त्यावर मळगाव येथील हॉटेल कोकण क्राऊन नजिक बेवारस उभ्या असलेल्या ६ चाकी ट्रॅक मधील बेकायदेशीर दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाने कारवाई करत तब्बल ३८ लाख ७६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई काल १५ रोजी सकाळी…

Read More

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जीवनदान शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

जिल्हा युवती काँग्रेस उपाध्यक्ष जास्मिन लक्ष्मेश्वर यांनी राबवला उपक्रम सावंतवाडी ता.१६-: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्हा युवती काँग्रेसच्या वतीने झाराप येथील जीवनदान शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्हा युवती काँग्रेस उपाध्यक्ष जास्मिन लक्ष्मेश्र्वर यांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला होता. यावेळी त्यांनी 75 वा स्वातंत्र्यदिन या मुलांसोबत साजरा केला. यावेळी जिल्हा युवती…

Read More

ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या ” म्युझिक कॉर्नरच्या” नवीन दालनाचा शानदार शुभारंभ …

सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडीत गेली अनेक वर्ष सावंतवाडीसह पंचक्रोशीतील नागरिकांना दर्जेदार सुविधा देऊन ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले बाजारपेठेतील जय प्रकाश चौक येथील “म्युझिक कॉर्नरच्या” नूतन दालनाचे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून काल उद्घाटन त्यांच्या आई उमा शंकर हावळ यांच्या हस्ते फित कापून शानदार उद्घाटन करण्यात आले आहे. या नूतन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते….

Read More

आंबोली ग्रामपंचायतीच्यावतीने माजी सैनिकांचा सत्कार

१६० माजी सैनिकांचा शाल श्रीफळ आणि प्रमाणपत्र देवून सत्कार ⚡आंबोली, ता.१६-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने ग्रामपंचायत आंबोलीच्या वतीने येथील माजी सैनिकांचा शाल श्रीफळ आणि प्रमाणपत्र देवून काल सत्कार करण्यात आला.येथील १६० माजी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. आंबोली ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सावित्री पालेकर,उपसरपंच दत्तू नार्वेकर,ग्रामपंचायात सदस्य महेशपावसकर,शंकर चव्हाण,काशीराम…

Read More

मळगाव येथील ज्येष्ठ दशावतारी कलाकार बाबी लातये यांचे निधन

⚡सावंतवाडी ता.१६-: मळगाव- तेलकाटावाडी येथील रहिवासी ज्येष्ठ दशावतारी कलाकार सखाराम गणेश लातये उर्फ बाबी लातये (लातये मामा) (७५) यांचे रविवारी निधन झाले. बाबी लातये हे पंचायत समिती व नंतर सार्वजनिक बांधकाम विभागात कामाला होते. आपली नोकरी व घर सांभाळून त्यांनी मळगाव स्थानिक दशावतार मंडळातून दशावतार नाटकात काम केले. मळगाव दशावतार पेटाऱ्यातील गणपतीची त्यांनी दशावतार नाटकात…

Read More

माठेवाडा येथील अंगणवाडीच्या बालकानी जागविल्या देशभक्तांच्या आठवणी

⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील अंगणवाडीच्या छोट्या बालकानी देशभक्तांच्या वेशभूषा साकार करून काल अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी देशभक्तांच्या आठवणी जागविल्या. भारत देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ज्यानी देशासाठी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले अशा देशभक्त समाज सुधारक व्यक्तींची व्यक्तिरेखा सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील अंगणवाडी क्रमांक 66 च्या चार वर्षीय बालकांनी साकारून अभिनव पद्धतीने…

Read More
You cannot copy content of this page