शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली माहिती:मुख्यमंत्री, उपमुखमंत्री यांच्यासह अनेक मंत्र्यांची उपस्थिती..
⚡कुडाळ ता.२५-: दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवरायांचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा सनई-चौघडे, ढोल-ताशे, तुतारी आणि रणशिंगांच्या गजरात मोठ्या उत्साहात यंदा शनिवार,२७ जून २०२६ रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाने संपन्न होणार आहे. अशी माहिती शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली
यावेळी बोलताना श्री पवार म्हणाले, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड ही संस्था गेल्या ३२ वर्षांपासून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या पवित्र तिथीनुसार छत्रपती शिवरायांचा “श्री शिवराज्याभिषेक सोहळा” किल्ले रायगडावर अत्यंत दिमाखदार आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करत आहे. लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत आनंद, उत्साह आणि मराठ्यांच्या ऐतिहासिक वैभवाला साजेशा वातावरणात हा सोहळा दरवर्षी पार पडतो.
समितीच्या या अखंड आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनदेखील ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षापासून या शिवकार्यामध्ये सहभागी झाले असून, या सोहळ्याची व्याप्ती देशपातळीवर अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.सगळीकडे पारतंत्र्याचा अंधार पसरला असताना, नूतन सृष्टी निर्माण करून, भारताच्या इतिहासात हिंदवी स्वराज्याची स्थापना करत, हिंदूंचे स्वतंत्र सिंहासन निर्माण करणाऱ्या या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा अद्वितीय अनुभव घेण्यासाठी सर्व शिवप्रेमींनी रायगडावर आवर्जून उपस्थित राहावे. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,. श्रीम. सुनेत्राताई पवार ,सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड. आशिष शेलार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मंत्री- उद्योग आणि मराठी भाषा उदय सामंत, मंत्री- मत्स्यव्यवसाय व बंदरे पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा नितेश राणे, खासदार सुनील तटकरे, कुडाळ-मालवण आमदार निलेश राणे, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. नेहा भोसले, पोलिस अधीक्षक रायगड, अलिबाग आंचल दलाल, उपजिल्हाधिकारी, रायगड रविंद्र शेळके, प्रांताधिकारी पोपटराव ओमासे महाड, सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर संलग्न सर्व संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी शिवप्रेमी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सोहळ्याचे स्वागताध्यक्ष.कॅबिनेट मंत्री रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास, आमदार, शिवसेना उपनेते भरतशेठ गोगावले आहेत अशी माहिती श्री पवार यांनी दिली.
पुढील प्रमाणे कार्यक्रम होणार आहेत. ज्येष्ठ शुद्ध द्वादशी शुक्रवार दि. २६ जून रोजी सकाळी ९.०० वा. : श्री गडदेवता शिर्काई पूजन (श्री शिर्काई मंदिर), सकाळी १०.०० वा. : श्री छत्रपती शंभू महाराज जयंती उत्सव (राजसदर) शंभुराई पूजन, शंभु व्याख्यान, दुपारी १२.०० वा. : महादरवाजा पूजन आणि तोरण, दुपारी १२.३० वा. : श्री जगदीश्वर पूजन व अभिषेक श्री व्याडेश्वर पूजन व अभिषेक श्री भवानी देवी पूजन व अभिषेक, दुपारी १.०० वा. : महादरवाजा ध्वजारोहण, सांय ५.०० वा. : श्री शिवतुलादान विधी, सांय ६.०० वा. : पारंपारिक गोंधळ, सांय ९.३० वा. : सांस्कृतिक कार्यक्रम, ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी श्री शिवराज्याभिषेक दिन – शनिवार दि. २७ जून २०२६ सकाळी ७.०० वा. : ध्वजारोहण सोहळा (नगारखाना), सकाळी ९.०० वा. : श्री शिवराज्याभिषेक सोहळा (राजसदर) सुवर्ण होन, शिवराई पूजन सकाळी १०.३० वा. : श्री शिवसन्मान सोहळा, सकाळी ११.०० वा. भव्य श्री शिव पालखी सोहळा, सकाळी ११.३० वा. : महाप्रसाद, दुपारी २.०० वा. : गडस्वच्छता व सांगता असे कार्यक्रम होणार आहेत. अशी माहिती श्री. पवार यांनी दिली.
