Headlines

डॉ. किरण मराठे यांच्या सुपुत्राची सुवर्णकामगिरी; डी.एम. कार्डिओलॉजी परीक्षेत सुवर्णपदक पटकावले..

राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २८ व्या पदवीदान सोहळ्यात डॉ. कुणाल मराठे यांचा गौरव; सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा

⚡देवगड ता.२५-:
देवगड तालुक्यातील जामसंडे येथील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. किरण मराठे यांचे सुपुत्र डॉ. कुणाल किरण मराठे यांनी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. कर्नाटकातील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (RGUHS) २८ व्या वार्षिक पदवीदान समारंभात डॉ. कुणाल मराठे यांना डी.एम. कार्डिओलॉजी (DM Cardiology) या उच्च पदवी अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल सुवर्णपदक (Gold Medal) प्रदान करण्यात आले.
१६ जून २०२६ रोजी बंगळुरू येथे संपन्न झालेल्या विद्यापीठाच्या २८ व्या वार्षिक पदवीदान सोहळ्यात हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा आणि आव्हानात्मक मानला जाणारा डी.एम. कार्डिओलॉजी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करत सर्वाधिक गुण मिळविण्याचा मान डॉ. कुणाल मराठे यांनी मिळविला आहे.
या विशेष कामगिरीबद्दल विद्यापीठाकडून त्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. पदवीदान सोहळ्यात डॉ. कुणाल मराठे यांच्यासमवेत त्यांचे आई-वडील उपस्थित होते. मुलाच्या या अभूतपूर्व यशामुळे मराठे कुटुंबियांसह जामसंडे व देवगड परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात हृदयरोग उपचार शाखा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अशा प्रतिष्ठित शाखेत उच्च शिक्षण घेत उत्कृष्ट गुणवत्तेच्या जोरावर सुवर्णपदक पटकावणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून सांगितले जात आहे. डॉ. कुणाल मराठे यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही वैद्यकीय क्षेत्रात उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.
जामसंडे येथील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉ. किरण मराठे यांनी अनेक वर्षे वैद्यकीय सेवेद्वारे समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत डॉ. कुणाल मराठे यांनीही वैद्यकीय शिक्षणात उत्कृष्टता सिद्ध केली असून त्यांच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
तसेच त्याची पत्नी सौ मयुरी कुणाल मराठे या MD medicine (MUHS) Maharashtra University of health sciences सर्वाधिक गुण 2 गोल्ड medal मिळवली असून त्या nephrology या विषयात बेंगलोर येथे superspeciality चा अभ्यास करता आहेत
डॉ. कुणाल मराठे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय संस्था तसेच मित्रपरिवार आणि नागरिकांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

You cannot copy content of this page