Headlines

सुकळवाड येथील एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी डिप्लोमा कॉलेजचा १०० टक्के निकाल…

⚡मालवण ता.२५-:
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई डिप्लोमा अभ्यासक्रमाचा उन्हाळी सत्र परीक्षेचा सिव्हिल व मेकॅनिकल विभागाचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट कॉलेजचा अंतिम वर्ष अभियांत्रिकी पदविका परीक्षेचा सिव्हिल व मेकॅनिकल विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे.

या परीक्षेत एमआयटीएम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे. सिव्हिल विभागातून सागर इंदप यांने ८३ टक्के गुण मिळवून प्रथम, तृप्ती वंजारे हिने ८३ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर शिवम परब यांने ७९ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

त्याचप्रमाणे मेकॅनिकल विभागातील दुर्वांकुर सावंत याने ८३. ८३ टक्के टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. वेदांग चव्हाण याने ८०. ३९ टक्के गुण मिळवून द्वितीय तर गजेंद्र टिक्कस याने ७९. ८९ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे विश्वस्त व डिप्लोमा प्राचार्य विशाल कुशे यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page