आंबोली ग्रामपंचायतीच्यावतीने माजी सैनिकांचा सत्कार

१६० माजी सैनिकांचा शाल श्रीफळ आणि प्रमाणपत्र देवून सत्कार

⚡आंबोली, ता.१६-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने ग्रामपंचायत आंबोलीच्या वतीने येथील माजी सैनिकांचा शाल श्रीफळ आणि प्रमाणपत्र देवून काल सत्कार करण्यात आला.येथील १६० माजी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. आंबोली ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच सावित्री पालेकर,उपसरपंच दत्तू नार्वेकर,ग्रामपंचायात सदस्य महेश
पावसकर,शंकर चव्हाण,काशीराम राऊत,छाया नार्वेकर,सारिका गावडे,साक्षी गावडे,स्वप्नीता कर्पे, ग्रामविकास अधिकारी रतीलाल बहीरम,शशिकांत गावडे,संतोष पालेकर,प्रकाश गावडे,डॉ.राजीव सिन्हा,माजी सौनिक आणि नातेवाईक उपस्तीत होते.

You cannot copy content of this page