सावंतवाडी ता.१६-:
सावंतवाडीत गेली अनेक वर्ष सावंतवाडीसह पंचक्रोशीतील नागरिकांना दर्जेदार सुविधा देऊन ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले बाजारपेठेतील जय प्रकाश चौक येथील “म्युझिक कॉर्नरच्या” नूतन दालनाचे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून काल उद्घाटन त्यांच्या आई उमा शंकर हावळ यांच्या हस्ते फित कापून शानदार उद्घाटन करण्यात आले आहे.
या नूतन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. यावेळी ग्राहकांनी आपल्याला दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे आपण इथपर्यंत पोहचू शकलो असे मत हावळ बंधूंनी व्यक्त केला आहे. आमच्या दालनाच्या माध्यमातून दरवेळी विविध सण, उत्सवाच्या निमित्ताने आपण आमच्या प्रिय ग्राहकांसाठी विविध ऑफर दरवर्षी ठेवत असतो. तसेच यावेळी देखील स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण भारतात राबवण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा च्या पार्श्वभूमीवर हर घर वॉशिंग मशीन ही ऑफर दिली असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
यावेळी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक ऑफर देखील त्यानी यावेळी ठेवली असून, ” स्मार्ट इल.ई.टी. टिव्ही सोबत वॉशिंग मशीन फ्री” अशी अविश्वसनीय ऑफर आपल्या खास ग्राहकांसाठी ठेवण्यात आली आहे. या सर्व सेवा मर्यादित कालावधीसाठी असल्याने जास्तीत जास्त ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन हावळ बंधूंनी केले आहे. तर याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 9422054881 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
