जिल्हा युवती काँग्रेस उपाध्यक्ष जास्मिन लक्ष्मेश्वर यांनी राबवला उपक्रम
सावंतवाडी ता.१६-:
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्हा युवती काँग्रेसच्या वतीने झाराप येथील जीवनदान शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्हा युवती काँग्रेस उपाध्यक्ष जास्मिन लक्ष्मेश्र्वर यांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला होता. यावेळी त्यांनी 75 वा स्वातंत्र्यदिन या मुलांसोबत साजरा केला.
यावेळी जिल्हा युवती काँग्रेस उपाध्यक्ष जास्मिन मेहबूबसाब लक्ष्मेश्र्वर, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सचिव अमिदी मेस्त्री, स्मिता वागळे, मेहबूबसाब लक्ष्मेश्र्वर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा युवती उपाध्यक्ष जास्मिन लक्ष्मेश्र्वर यांनी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या मुलांच्या शिक्षणासाठी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन केले आहे.
