अंमली पदार्थ व सायबर गुन्हेगारी विषयक मार्गदर्शन संपन्न
वेंगुर्ला
वेंगुर्ला पोलीस ठाणे मार्फत वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला येथे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने “अमली पदार्थांचे दुष्परिणाम व सायबर गुन्हेगारी” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी तसेच पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी
शाळेचे पर्यवेक्षक रवी थोरात यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर श्री. ओतारी यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अशा घातक व्यसनांपासून दूर राहणे आवश्यक असून, अमली पदार्थांशी संबंधित बेकायदेशीर कृत्यांमुळे कायदेशीर कारवाई व गुन्हे दाखल होऊ शकतात, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनl केले. तसेच वाढत्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने मोबाईल, इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी, ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, ओटीपी शेअर करण्याचे धोके, सोशल मीडिया गैरवापर आणि वैयक्तिक माहितीची सुरक्षितता याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबतही विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. इयत्ता आठवी ते दहावीच्या सुमारे २०० विद्यार्थी उपस्थित होते. घेतला.यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित भविष्याची दिशा देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली दाभोली इंग्लिश स्कुल मध्ये अमली पदार्थ व सायबर गुन्हेगारी बाबत मार्गदर्शन संपन्न झाले.
सुरक्षित सिंधुदुर्ग अभियान अंतर्गत वेंगुर्ला पोलीस ठाणे व MKCL निकॉम कॉम्पुटर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.
शालेय विदयार्थ्यांना अमली पदार्थ चे दुष्परिणाम याची माहिती वेंगुर्ला पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांनी दिली. सायबर गुन्हेबाबत माहिती निकॉम कॉम्पुटर चे प्रशांत निकम यांनी मोबाईल चे दुष्परिणाम तसेच या बाबत होणारे विविध सायबर गुन्हे याची माहिती दिली.
या निमित्तने शाळेत सुरु असणारा रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण या विभागाच्या फलकाचे अनावरण वेंगुर्ला पोलीस उपनिरीक्षक श्री शेखर दाभोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाणारी
दाभोली इंग्लिश स्कुल मध्ये सुरु असलेल्या आर एस पी विभाग या माध्यमातून शालेय विद्यार्थी ना दिले जाणारे रस्ता सुरक्षा विषयक ज्ञान व अल्पवईन विद्यार्थी कडून रस्त्यावर होणारे अपघात या बाबत होणारी जागरूकता या साठी आर एस पी हा विषय मार्गदर्शक आहे, असे सांगितले. तसेच भविष्यात पोलीस विभाग वतीने विविध बंदोबस्त ठिकाणी आर एस पी विद्यार्थी चे विविध शहरामध्ये सहभाग घेऊन विद्यार्थी ना प्रत्यक्ष ट्रॅफिक नियंत्रण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले जाईल, असे सांगितले. यावेळी हायस्कुल मुख्याध्यापक तथा आर एस पी जिल्हा समादेशक किशोर सोनसुरकर यांनि आर एस विषय बाबत माहिती देऊन शाळेत आयोजित विविध उपक्रम बाबत माहिती दिली. यावेळी शाळेच्या शिक्षिका रेश्मा चोडणकर, वसंत पवार होमगार्ड,श्री शेटकर आदी उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूल, मातोंड येथे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत व अमली पदार्थ विरोधी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सायबर सुरक्षा व अपराध प्रतिबंध व अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला वेंगुर्ला पोलिस ठाणेचे उपनिरीक्षक शेखर दाभोलकर व त्यांचे सहकारी आणि श्री सिद्धिविनायक कॉम्प्युटर शिरोडाचे संचालक श्री. निखार्गे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम त्यांचे दुरोगामी परिणाम यासंबधी मार्गदर्शन केले. सिद्धिविनायक कॉम्प्युटरचे श्री. निखार्गे यांनी मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया यांचा सुरक्षित वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. तसेच ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, ओटीपी शेअर करण्याचे धोके, सायबर गुन्ह्यांपासून बचावाचे उपाय यांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले. यावेळी शाळेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान मातोंड गावच्या सरपंच मयुरी वडाचेपाटकर यांनी भूषविले. यावेळी शाळा समितीचे सदस्य रावजी परब व संस्थेच्या समन्वय समिती सदस्य ज्ञानेश्वर केळजी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना डिजिटल युगात सतर्क राहण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत शिक्षक व पालकांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश चांदणे सर यांनी व ज्येष्ठ शिक्षक संजय तुळसकर यांनी आभार मानले.
