Headlines

निलेश राणेंच्या आक्रमक भूमिकेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी ७१.०५ कोटींचा निधी मंजूर…

संजू परब यांनी मानले निलेश राणेंचे आभार; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा…

सावंतवाडी, ता. २६ : निलेश राणे यांनी काल
विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही झाला आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात ७१.०५ कोटी रुपयांचा नुकसान भरपाई निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.


यावेळी संजू परब म्हणाले, “शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ठामपणे भूमिका मांडणारे नेतृत्व म्हणून निलेश राणे यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे नेतृत्व मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे.”
ते पुढे म्हणाले, “जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र नुकसान भरपाईचा निधी मिळण्यात विलंब होत होता. निलेश राणे यांनी हा मुद्दा प्रभावीपणे मांडल्यानंतर कृषी विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो.”
“मी स्वतः शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या निलेश राणे यांच्या भूमिकेचे आम्ही सर्वजण अभिनंदन करतो,” असेही परब यांनी सांगितले.

You cannot copy content of this page