माठेवाडा येथील अंगणवाडीच्या बालकानी जागविल्या देशभक्तांच्या आठवणी

⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील अंगणवाडीच्या छोट्या बालकानी देशभक्तांच्या वेशभूषा साकार करून काल अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी देशभक्तांच्या आठवणी जागविल्या.

भारत देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ज्यानी देशासाठी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले अशा देशभक्त समाज सुधारक व्यक्तींची व्यक्तिरेखा सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील अंगणवाडी क्रमांक 66 च्या चार वर्षीय बालकांनी साकारून अभिनव पद्धतीने साकारल्या.

यावेळी करण्यात आलेल्या ध्वजारोहणाच्या ठिकाणी या बालकांनी महात्मा गांधी बापूजी, सरोजिनी नायडू, सुभाषचंद्र बोस, सिंधुताई सपकाळ, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, प्रियदर्शनी इंदिरा गांधी, अहिल्याबाई होळकर, पंडित जवाहर नेहरू यांच्या व्यक्तिरेखा साकारल्या. भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशा घोषणा यावेळी देण्यात आला या व्यक्तिरेखेमध्ये नूतन पोकळे हिने सरोजिनी नायडू यांची व्यक्तिरेखा साकारली तर सार्थक नेवगी याने सुभाष चंद्र बोस यांची लावण्या राऊळ हिने सिंधुताई सपकाळ, विहान परब याने पंडित जवाहरलाल नेहरू, नुपूर पोकळे हिने सावित्रीबाई फुले यांची व्यक्तिरेखा तर मिहीर सावंत याने स्वामी विवेकानंद साकारले सुखम करमळकर याने लोकमान्य टिळक,इशिता कडगावकर हिने प्रियदर्शनी इंदिरा गांधी तर महात्मा गांधीजी यांची व्यक्तिरेखा श्री नेवगी या बालकाने साकारली या मध्ये लावण्या राऊळ स्निग्धा प्रभू भावेश साळुंखे अर्णव धारगळकर भार्गवी मुंज आरुष धारगळकर वैष्णवी चव्हाण यांनी या 15 स्वातंत्र्यवीर देशभक्तांच्या महान व्यक्तींच्या व्यक्तिरेखा हुबेहूब साकारल्या यातून ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला.

यावेळी अंगणवाडी सेविका सौ अनुराधा पवार अंगणवाडी मदतनीस सौ अमिषा सासोलकर प्रशाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी खानोलकर शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष नंदकुमार गावडे शिक्षक पालक माता संघाचे पदाधिकारी आणि पालक वर्ग उपस्थित होते सुरुवातीला मुख्याध्यापिका शुभांगी खानोलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले त्यानंतर देशभक्तीपर गीते मुलानी सादर केली खाऊ वाटपानंतर वेशभूषा सादर करताना त्या त्या ऐतिहासिक व्यक्तींच्या बाबतची माहिती देण्यात आली 75 अमृत महोत्सवानिमित्त साजरा करण्यात आलेल्या स्वातंत्र्यदिनी देशभक्तांच्या आठवणींना अंगणवाडीच्या छोट्या छोट्या बालकांनी उजाळा दिला.

You cannot copy content of this page