⚡वेंगुर्ले ता.१६-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून दाभोली-तळेथर शाळेत शिक्षणप्रेमी राजाराम कांबळी याच्या पुढाकाराने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत रामचंद्र शिरोडकर (प्रथम), निधीर राजापूरकर (द्वितीय) व राम मांजरेकर (तृतीय) यांनी क्रमांक पटकाविले.
या सर्वांना ज्ञानदा विकास संस्थेचे अध्यक्ष संदिप पाटील यांनी पुरस्कृत केलेल्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी फटू शिरोडकर, समिर शेगले, प्रसाद माडये, नरेंद्र राजापूरकर, राजाराम कांबळी, आपा शिरोडकर, नितेश राजापूरकर, दाजी राजापूरकर, सुनिल राजापूरकर, स्वाती राजापूरकर, विनय राजापूरकर, संतोष काकडे, कुंदा, सुभाष राजापूरकर, अर्जुन गावडे, नमिता पडवळ आदी उपस्थित होते. हर्षल राजापूरकर व राजाराम कांबळी यांनी मुलांना खाऊचे वाटप केले.
