मतदारसंघात मंत्री होऊन आलेले दिपक केसरकरांना पडला जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांचा विसर…

रूपेश राऊळ:चांदा ते बांदा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आसल्याच केला आरोप..

⚡सावंतवाडी ता.१६-: मंत्री होऊन मतदारसंघात आलेले दिपक केसरकर यांना जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्न सोडविण्याचा त्यांना विसरल पडला असल्याची जोरदार टिका आज आयोजित पत्रकार परिषदेत रूपेश राऊळ यांनी केली. दरम्यान शेतकऱ्याचे झालेले नुकसान भरपाई पंचनामा केला की नाही याचा साधा आढावा देखील घेतला नाही. त्यामुळे केसरकर हे पूर्णपणे अपयशी असल्याची टीका रूपेश राऊळ यांनी केली.

यावेळी रूपेश राऊळ बोलताना पुढे म्हणाले की पर्यटन व चांदा ते बांदा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच आरोप देखील रूपेश राऊळ यांनी यावेळी केला.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, शेतकरी विमा कंपनीने शेतकऱ्यांची चेष्ठा केली असून, पर्यटन विकास कामांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप त्यानी यावेळी केला आहे. पर्यटन विकासामध्ये जे जे उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये भ्रष्टाचार झालं आहे. चांदा ते बांदा या योजनेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, त्याची माहिती आपण मागवली असल्याची माहिती रुपेश राऊळ यांनी दिली आहे.

यावेळी उप जिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार,गुनाजी गावडे अपर्णा कोठावळे,प्रशांत कोठावळे आदी उपस्थित होते.

यावेळी उप जिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार,अपर्णा कोठावळे,प्रशांत कोठावळे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page