⚡कणकवली ता.१६-:
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कोळोशी,सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग व एच.डी. एफ.सी बँक कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.यावेळी २० रक्तदाते व ३३ गरजू ग्रामस्थांनी नेत्र तपासणी करून घेतली.या शिबिरास ग्रामीण व छोटा गाव असूनसुद्धा उत्तम प्रतिसाद मिळाला.
या रक्तदान शिबिरात उपनिरीक्षक राजकुमार मुंढे यांनी स्वतः रक्तदान करत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य हर्षदा वाळके,कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हुलावले ,उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, तसेच सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठानचे जिल्हा सदस्य उद्धव गोरे,प्रकाश जाधव,अमोल भोगले, श्रीम.पाटकर,एच.डी. एफ.सी बँकेचे श्री.लाखन यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
एवढेच नव्हे तर पोलीस उप निरीक्षक श्री. मुंढे यांनी स्वतः सुद्धा रक्तदान केले त्यामुळे रक्तदान करण्याच्या या चळवळीला एकप्रकारचे बळ मिळाले.शिबिरात सहभागी रक्तदाते यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.हे शिबिर पार पाडण्यासाठी जिल्हा रक्तपेढी,ओरोस व त्यांची टीम तसेच नेत्र तपासणी चिकित्सक डॉ.कदम यांनी सहकार्य केले.शिबिर यशस्वी करण्यासाठी सरपंच रितिका सावंत, ग्रा. प.सदस्य विश्वनाथ कदम ,वैशाली इंदप , सानिका इंदप,गीता पावसकर, पोलिस पाटील संजय गोरुले,पोस्टमन समीर मिठबावकर, वायरमन सुनील इंदप, अनंत आचरेकर, ग्रा. प. कर्मचारी संतोष तावडे,राजेंद्र इंदप, सदानंद पवार व पूर्वा तांबे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक मंगेश राणे यांनी केले.
