Headlines

डॉ. दिनेश नागवेकर यांचा भंडारी समाजरत्न पुरस्काराने सन्मान

सावंतवाडी : तालुका भंडारी मंडळाचा “भंडारी समाजरत्न” पुरस्कार डॉ.‌ दिनेश नागवेकर यांना प्रदान करण्यात आला. मान्यवरांचे हस्ते त्यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी भंडारी जिल्हा महासंघाचे अध्यक्ष हेमंत कळंगुटकर, सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, माजी शिक्षण सभापती गुरूनाथ पेडणेकर, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, देविदास आडारकर, संजय पिळणकर, उदय पारिपत्ये, नंदकिशोर कोंडये,…

Read Full News

झाराप, इन्सुली व बांदा येथील फ्लायओव्हरचे थर्ड पार्टी स्ट्रक्चरल ऑडिट करा…

डॉ. जयेंद्र परुळेकर यांची मागणीपावसाळ्यात पुलांवर भगदाडे पडत असल्याचा दावा;नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.. ⚡सावंतवाडी, ता.०२-: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील झाराप, खामदेव नाका (इन्सुली) आणि बांदा येथील फ्लायओव्हर पुलांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत या तिन्ही पुलांचे स्वतंत्र (थर्ड पार्टी) स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे…

Read Full News

सिंधुदुर्गनगरीत उद्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा…

‘इथे ओशाळला मृत्यू’ने रंगणार शौर्याचा जागर:पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण; शरद कृषी भवनात ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचे सादरीकरण.. ⚡ओरोस ता २-: विकासकामांच्या लोकार्पणाचा उत्सव आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची शौर्यगाथा उलगडणारा ऐतिहासिक नाट्यप्रयोग असा अनोखा संगम सोमवारी (ता. ३) सिंधुदुर्गनगरीत अनुभवायला मिळणार आहे. नवनगर प्राधिकरण रहिवासी संघाच्या वतीने विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आणि प्रा….

Read Full News

मालवणात ४ रोजी हाडांची खनिज घनता तपासणी शिबिराचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी) वाढते वय, बदलती जीवनशैली आणि शरीरातील कॅल्शियमची कमतरता यामुळे हाडांची घनता कमी होण्याचा धोका वाढतो. हाडे कमकुवत होऊन ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी योग्य वेळी तपासणी करणे महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने लिमये हॉस्पिटल, मालवण आणि रोटरी क्लब, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हाडांची खनिज घनता (Bone Mineral Density – BMD) तपासणी शिबिराचे…

Read Full News

दिशाहीन झालेल्या समाजाला ‘रामराज्याची’ नितांत आवश्यकता…

वामन परब :मालवणात सनातन संस्थेतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा.. ⚡मालवण ता.०२-:संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसऱ्या विश्वयुद्धाचे संकट, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे समाजाला ग्रासलेले नैराश्य, अशा अत्यंत भीषण आणि अस्थिर परिस्थितीतून समाजाला तारण्यासाठी आता केवळ भौतिक उपाययोजना पुरेशा नाहीत. आज दिशाहीन झालेल्या समाजाला पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांच्या आदर्शावर आधारित ‘रामराज्याची’ नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सनातन…

Read Full News

वाचनालय कर्मचाऱ्यांच्या पाठीशी वाचनप्रेमीवेतनश्रेणी लागू करण्यासाठी आवाज उठविणार

मालवण दि प्रतिनिधीवाचन संस्कृती वाढविण्यासाठी अपु-या मानधनावर काम करणा-या वाचनालय कर्मचाऱ्यांना निदान चतुर्थ श्रेणी वेतनश्रेणी लागू करावी किंवा मानधनात तरी वाढ करावी यादृष्टीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाचन प्रेमी वाचनालय कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आवाज उठविण्याचा महत्वपूर्ण निर्णय श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय आचराच्या 132व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थितांमधून घेण्यात आला. यावेळी या बाबत पालकमंत्री…

Read Full News

श्री रामेश्वर वाचन मंदिर, आचराचा चोखंदळ महिला वाचक पुरस्कार श्रीम. निशा यशवंत पटवर्धन यांना प्रदान

मालवण दि प्रतिनिधी ॲड. सायली मारुती आचरेकर पुरस्कृत श्री.मारुती प्रभाकर आचरेकर स्मरणार्थ श्री रामेश्वर वाचन मंदिर, आचरा आयोजित सन २०२६ चा चोखंदळ महिला वाचक पुरस्कार श्रीम. निशा यशवंत पटवर्धन रा.आचरा वरचीवाडी यांना संस्थेचे उपाध्यक्ष अशोक कांबळी पुरस्कर्त्या श्रीमती मृणालिनी मारुती आचरेकर, अथर्व मारुती आचरेकर, जिल्हा परिषद सदस्या सौ वर्षा सांबारी,यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी…

Read Full News

कळसुलीत उद्या रानभाज्या प्रदर्शन व विक्री उपक्रम

पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्यासह रानभाज्यांच्या महत्त्वाची होणार जनजागृती कणकवली : बदलत्या जीवनशैलीमुळे विस्मृतीत जात असलेल्या पारंपरिक रानभाज्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कळसुली भोगनाथ नं. ३ यांच्या वतीने उद्या ३ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय, कळसुली येथे रानभाज्या प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत हा…

Read Full News

बिडवाडीत आंतरशालेय प्राथमिक वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकलेला मिळाला नवा मंच; विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव कणकवली : ग्राम विकास संघटना बिडवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आंतरशालेय प्राथमिक वक्तृत्व स्पर्धा – २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत प्रभावी वक्तृत्व सादर केले. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, देशप्रेम आणि सार्वजनिक वक्तृत्वाची आवड वाढीस लागल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त…

Read Full News

सिंधुदुर्गच्या ‘सहा तारका’ मुंबईत चमकणार…

नशामुक्त भारत… अंतर्गत स्पर्धांचा निकाल जाहीर:आठ गटातील स्पर्धकांची राज्यस्तरीय निवड.. कुडाळ : माय भारत सिंधुदुर्गच्या वतीने घेण्यात आलेल्या नशा मुक्त भारत ग्रुप डान्स स्पर्धेत येथील संत राऊळ महाराज कॉलेजच्या सिक्स तारका ग्रुपने सिंधुदुर्गचे नेतृत्व करत त्यांची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. चित्रकला स्पर्धेत राम बिबवणेकर, पथनाट्यमध्ये तत्परा चौधरी विजेत्या ठरल्या. आठ प्रकारातील…

Read Full News

You cannot copy content of this page