Headlines

सिंधुदुर्गच्या ‘सहा तारका’ मुंबईत चमकणार…

नशामुक्त भारत… अंतर्गत स्पर्धांचा निकाल जाहीर:आठ गटातील स्पर्धकांची राज्यस्तरीय निवड..

कुडाळ : माय भारत सिंधुदुर्गच्या वतीने घेण्यात आलेल्या नशा मुक्त भारत ग्रुप डान्स स्पर्धेत येथील संत राऊळ महाराज कॉलेजच्या सिक्स तारका ग्रुपने सिंधुदुर्गचे नेतृत्व करत त्यांची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. चित्रकला स्पर्धेत राम बिबवणेकर, पथनाट्यमध्ये तत्परा चौधरी विजेत्या ठरल्या. आठ प्रकारातील विविध स्पर्धातील विजेत्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
    माय भारत सिंधुदुर्गच्या वतीने नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत… अंतर्गत लोकनृत्य, गायन, चित्रकला, लघुपट, लेखन,कविता, आदी स्पर्धेचे आयोजन संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात गुरुवारी करण्यात आले होते. स्पर्धेचे बक्षीस वितरण संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ स्मिता सुरवसे, जेष्ठ साहित्यिक मंगेश मसके, मेरा युवा भारत सिंधुदुर्ग कार्यक्रम अधिकारी अपेक्षा मांजरेकर, श्री गणेश क्रीडा सांस्कृतिक मंडळ गुढीपुर पिंगुळी अध्यक्ष रणजीत रणसिंग, प्रा जांभळे, प्रा ठाकूर, सुरेश पवार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा भावेश चव्हाण, प्रा सबा शहा,  प्रा प्रणव तेडोलकर, कृष्णा ठाकूर, प्रसन्ना गंगावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
    यावेळी बोलताना श्री मसके म्हणाले, कोणत्याही स्पर्धेला जाण्यापूर्वी स्पर्धकांनी आपली कला सादर करताना जो विषय आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. शासनाच्या विविध स्पर्धा आहेत. त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या कलाक्षेत्रातील विविध पैलूंना व्यासपीठ मिळण्याचे माध्यम या सर्व कला आहेत. माय भारत सिंधुदुर्गच्या वतीने घेण्यात आलेल्या नशा मुक्त भारत या स्पर्धेत  जिल्हा पातळीवरून  राज्यपातळीवर मुंबई येथे निवड झालेल्या स्पर्धक संघाला दिल्ली येथे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी  प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. विजेत्या ठरलेल्या स्पर्धक संघाने अशा स्पर्धेला जाण्यापूर्वी गुरूच्या मार्गदर्शनाखाली पुढची वाटचाल करावी. नृत्य नियमावलीबाबत  परिपूर्ण माहिती घेऊन नशा मुक्त भारत या शीर्षकाला साजेसे नृत्य किंवा इतर उपक्रमांतर्गत  स्पर्धकानी सामोरे जावे. मुंबई येथे यश मिळवून आपला सांस्कृतिक कलेचा झेंडा 15 ऑगस्टच्या दिल्ली दरबारी न्यावा असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक मंगेश मसके यांनी करून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धा निकाल – नृत्य स्पर्धा – प्रथम सहा तारका गट, द्वितीय निलम  कदम, तृतीय टी. एस. सावंत गट, पथनाट्य (नुक्कड नाटक)/माइम ॲक्ट्स स्पर्धा प्रथम तत्परा चौधरी, चित्रकला स्पर्धा प्रथम राम बिबवणेकर,  द्वितीय प्रथमेश वेंगुर्लेकर, तृतीय आदेश चौकेकर, संगीत (लोकगीते) प्रथम साईशा  पाटील, वादविवाद स्पर्धा प्रथम समृद्धी शेट्ये, द्वितीय पार्थ कोळंबकर, तृतीय गीता खानोलकर, लघुपट/रील स्पर्धा प्रथम नेहा कोंडसकर, द्वितीय आदित परब, स्लोगन लेखन स्पर्धा प्रथम कोमल ढोलम, द्वितीय हास्या गोसावी, तृतीय मयूर करगुटकर, स्लॅम कविता स्पर्धा  प्रथम कार्तिक  नारकर, द्वितीय  राखी  सामंत, तृतीय गौरी गावकर हे विजेते ठरले.
स्पर्धा परीक्षक म्हणून नृत्य गायन व पथनाट्यसाठी मंगेश मसके, निलेश जोशी  अजय सावंत, वादविवादसाठी प्रा एस के आवटे, प्रा मंगेश जांभळे, सुरेश पवार, चित्रकला स्पर्धेसाठी प्रा आर वाय ठाकूर, प्रा संतोष वालावलकर, अर्पिता मुंबरकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा भावेश चव्हाण यांनी केले तर आभार प्रा संतोष वालावलकर यांनी मानले.

You cannot copy content of this page