विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकलेला मिळाला नवा मंच; विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
कणकवली : ग्राम विकास संघटना बिडवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आंतरशालेय प्राथमिक वक्तृत्व स्पर्धा – २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत प्रभावी वक्तृत्व सादर केले. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, देशप्रेम आणि सार्वजनिक वक्तृत्वाची आवड वाढीस लागल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, देणगीदार, परीक्षक तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हातभार लावणाऱ्या सर्वांचे ग्राम विकास संघटना बिडवाडीच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
इयत्ता ५ वी ते ७ वी गटात कु. उर्वी रवींद्र तेली हिने प्रथम क्रमांक पटकावत मानचिन्ह व ₹१००१, कु. जयभवानी दिवाकर मेस्त्री हिने द्वितीय क्रमांक पटकावत मानचिन्ह व ₹५०१, तर कु. हरविता एकनाथ पवार हिने तृतीय क्रमांक पटकावत मानचिन्ह व ₹३०१ चे पारितोषिक मिळविले.
दुसऱ्या गटात कु. वेदांग सूर्याजी साळसकर याने प्रथम क्रमांक पटकावत मानचिन्ह व ₹१००१, कु. परिधी सुमंत तांबे हिने द्वितीय क्रमांक पटकावत मानचिन्ह व ₹५०१, तर कु. रिहान राकेश चव्हाण याने तृतीय क्रमांक पटकावत मानचिन्ह व ₹३०१ चे पारितोषिक मिळविले.
स्पर्धेतील सर्व विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच पारितोषिक न मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही निराश न होता अधिक तयारीने पुढील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी आयोजकांनी “माझं गाव, माझी जबाबदारी” या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत ग्राम विकास संघटना बिडवाडीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
