कुडाळ : येथे विराजमान झालेल्या सिंधुदुर्ग राजाचे दर्शन खासदार नारायण राणे व सौ. नीलमताई राणे, आमदार निलेश राणे यांनी घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली.
कुडाळ येथे राणे कुटुंबीयांच्या वतीने गेली सतरा वर्ष सिंधुदुर्ग राजा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी होत आहे. आज रविवारी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे. सौ नीलम ताई राणे, आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेतले. तसेच यावेळी त्यांच्या उपस्थितीत महाआरती सुद्धा झाली.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, अशोक सावंत, माजी जिल्हा परिषद सभापती सौ अस्मिता बांदेकर, जिल्हा महिला प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, रूपेश कानडे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन सावंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, शहर प्रमुख अभिषेक गावडे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, नगरसेवक विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, पप्या तवटे, रचना नेरुरकर, भाजप शहर अध्यक्ष सुनील बांदेकर, पंचायत समिती सदस्य निखिल कांदळगावकर आदी उपस्थित होते.
खासदार नारायण राणे यांनी सपत्नीक घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन
