Headlines

गोंधळी समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी शशिकांत इंगळे यांची निवड

ना. नितेश राणे यांनी केले कौतुक

कणकवली : अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी शशिकांत साहेबान्ना इंगळे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेतली.

यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी शशिकांत इंगळे यांचे अभिनंदन करून त्यांच्या निवडीचे कौतुक केले. तसेच गोंधळी समाजाच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच समाजाच्या विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर समाजाच्या विकासासाठी आणि समाजबांधवांना एकत्रित घेऊन विविध उपक्रम राबविण्याचा मानस शशिकांत इंगळे यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page