वराडकर हायस्कूल कट्टा येथे गावठी बाजाराला उस्फूर्त प्रतिसाद…!
⚡मालवण ता.०८-: आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आठवडा गावठी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या बाजारात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरात, परिसरात मिळणाऱ्या विविध गावठी वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. गावठी तांदूळ, नाचणी, कुळीथ पिठी, कोकम, चिंच, सुरण, गावठी पोहे ,आगळ ,खोबरेल तेल ,वालीचे गर, गावठी अंडी, भुईमुगाच्या शेंगा, काजूगर,…
