⚡मालवण ता.०६-:
मालवण ग्रामीण रुग्णालयात लोकमान्य टिळक यांची १०५ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, दीपप्रज्वलन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी मालवण येथील ज्येष्ठ लेखक, मुक्त पत्रकार, मुद्रित शोधक दिलीप रेडकर, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. शिनगारे, डॉ. मेहंदळे, डॉ. आवळे, आधीपारिचारिका सावंत, देसाई, कदम, प्रभू, तेली, राऊत, मिलन वस्त, चांदोसकर, उमेश पेडणेकर, क्ष-किरण चिकित्सक केळूसकर, लॅब टेक्निशियन श्री. खुपसे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.