⚡मालवण, ता.०६-:
मालवण शहरातील कोथेवाडा येथील रहिवासी व मालवण एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका श्रीमती सुषमा शरद पेडणेकर (वय-९१) यांचे आज सकाळी निधन झाले.
टोपीवाला प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी ३८ वर्षे सेवा बजावली. ही सेवा करताना त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले. विद्यार्थिप्रिय शिक्षिका म्हणून त्या ओळखल्या जात. आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे चार मुलगे, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. उद्या सकाळी ९ वाजता चिवला येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.