मालवण दांडी येथे महिलांसाठी उद्या नारळ लढविणे स्पर्धा…

⚡मालवण ता.०६-:
मालवणच्या माजी नगरसेविका व भाजप कार्यकर्त्या आणि भाजप महिला शहराध्यक्ष सौ. अन्वेषा आचरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने नारळी पौर्णिमे निमित्त दांडी मर्यादित महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दांडी शाळा रिक्षा स्टॅन्ड येथे आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत प्रथम – ५५५५ रु., द्वितीय – ३३३३ रु. अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी दि. ६ ऑगस्ट पर्यंत नावनोंदणी करावी. नारळ आयोजकांकडून पुरविले जातील. अधिक माहिती साठी ८४५९८९४१०८ व ९४०४३४४३२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page