मालवण बाजारपेठेत सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने व्यापारी वर्ग त्रस्त…

⚡मालवण ता.०६-:
मालवण बाजारपेठेत सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने व्यापारी वर्ग त्रस्त बनला असतानाच
बाजारपेठेतील वीज पुरवठा सुरुळीत करण्याच्यादृष्टीने मालवण वीज वितरण कंपनीने बाजारपेठ परिसरात दोन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मालवण व्यापारी संघांने दिली आहे

मालवण शहरात तसेच बाजारपेठेत वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. व्यापारी व दुकानदार वर्गाची अनेक कामे ही विजेवर अवलंबून असतात. मात्र अधून मधून वीज खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांच्या कामात अडथळे येत असून त्याचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या व्यापार, व्यवसायावर तसेच ग्राहकांना द्यावयाच्या सेवेवर होत आहे. यामुळे त्रस्त बनलेल्या मालवणच्या व्यापाऱ्यांनी मालवण वीज वितरण कार्यालयातील वीज अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. बाजारपेठेतील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा तसेच बाजारपेठेत अधिकचा विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. यावर वीज अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन बाजारपेठेत ट्रान्सफॉर्मर बसविण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page