दादा मडकईकर यांचा पावसाळी कविता सादरीकरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न…!

⚡बांदा ता.०६-: येथील नट वाचनालयचे माजी उपाध्यक्ष (कै.) सुभाष मोर्ये यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर यांचा पावसाळी कविता सादरीकरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्री मडकईकर यांनी एकापेक्षा एक सरस मालवणी कविता सादर करत उपस्थितांची जाग्यावर खिळवून ठेवले.
जि.प. केंद्रशाळा नं. १ येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मालवणी कवी दादा मडकईकर, वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, सुगंधा मोर्ये, सौ. श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, केंद्रशाळा बांदाचे मुख्याध्यापक शांताराम असनकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर (कै.) सुभाष मोर्ये यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत वाचनालयाचे सेक्रेटरी राकेश केसरकर यांनी केले.
यावेळी श्वेता कोरगावकर, प्रियांका नाईक, सुगंधा मोर्ये व कवी दादा मडकईकर यांनी आपले मनोगत व्यक्त करुन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी जि.प. केंद्रशाळा बांदाच्या विद्यार्थ्यांनी पावसाळी गीत, व नृत्य सादर केली. मालवणी कवी श्री मडकईकर यांनी आपल्या विविध कवितांचे सादरीकरण केले. यावेळी संजय देसाई यांनी आपली कविता सादर केली.
या कार्यक्रमाला वाचनालयाचे सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक शंकर नार्वेकर, जगन्नाथ सातोस्कर, अनंत भाटे, सौ. स्वप्निता सावंत, अंकुश माजगावकर, गुरुनाथ नार्वेकर, सौ. उज्ज्वला नार्वेकर, सौ. अर्चना सावंत, सौ. लक्ष्मी सावंत, सौ. सुवर्णलता धारगळकर, सौ. उर्मिला सावंत-मोर्ये, अच्युत पिळणकर, रामकृष्ण धुरी, शिक्षक जे. डी. पाटील, मधुमती आपटे, सौ. प्राची गावकर, तसेच प्रशालेचे शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते. आभार राकेश केसरकर यांनी मानले.
फोटो:-
बांदा येथे आयोजित पावसाळी कविता सादरीकरण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर.

You cannot copy content of this page