कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग मधून सर्वाधिक पेट्रोल, डिझेल विक्री:इंडियन ऑइल तर्फे सन्मान..
कुडाळ : इंडियन ऑईल गोवा डीव्हीजनल ऑफिस अंतर्गत असणाऱ्या सिंधुदुर्ग सेल्स एरिया मधुन श्री लक्ष्मीनारायण पेट्रोलियम कुडाळ यांना सर्वाधिक जास्त पेट्रोल, डिझेल तसेच एक्स्ट्रा ग्रीन डिझेल विक्री केल्याबद्दल तीन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हि निवड 2024-25 या वर्षातील कोल्हापुर आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील सर्वाधिक विक्री करण्यात येणाऱ्या पंपांमधून करण्यात आली
इंडियन ऑईल कॉ.लि. गोवा डीव्हिजन ऑफीस गोवा यांचा पुरस्कार वितरण सोहळा ८ ऑगस्ट रोजी कुडाळ कोकोनट हॉटेल येथे पार पडला. यावेळी सिंधुदुर्ग, कोल्हापुर आणि रत्नागिरी या तीन जिल्हयातील पंप डीलर उपस्थित होते. यावेळी 2024-25 या वर्षातील सर्वोत्तम सेल करणाऱ्या पेंद्रोल पंप डीलर्सना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या वेळी इंडीयन ऑईल गोवा डीव्हीजनल रिटेल सेल्स हेड मधुरेंद्र पांडे, सिनियन मॅनेजर श्री शाहीन, निलेश ठाकरे, रोहीत कांबळे, शुभम सागवेकर, विकाल सैनी तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापुर मधील पंप डीलर्स उपस्थित होते.
यावेळी इंडियन ऑईल गोवा डीव्हीजनल ऑफिस अंतर्गत असणाच्या सिंधुदुर्ग सेल्स एरिया मधुन श्री लक्ष्मीनारायण पेट्रोलियम कुडाळ यांना सर्वाधिक जास्त पेट्रोल, डिझेल तसेच एक्स्ट्रा ग्रीन डिझेल विक्री केल्याबद्दल या तीन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हि निवड 2024-25 या वर्षातील कोल्हापुर आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील सर्वाधिक विक्री करण्यात येणाऱ्या पंपांमधून करण्यात आली-.
यावेळी श्री पालव पेट्रोलियम हुमरमळा यांना सर्वाधिक एक्स्ट्रापॉवर कार्यविक्री तसेच देवगड तालुका खरेदी विक्री संघ यांना सर्वाधिक डिझेल विक्री वाढ आणि श्री मंगल एजन्सी राजापुर यांना सर्वाधिक ऑईल विक्रीसाठी गौरवण्यात आले. सर्वांचे आभार निलेश ठाकरे यांनी मानले.