माजगाव येथील पाटकर कुटुंबीयांचे विशाल परब यांनी केले सांत्वन…!

⚡सावंतवाडी ता.१०-:*  अपघातात मृत्यू पावलेल्या माजगाव कुंभारवाडा येथील रुपेश पाटकर यांच्या कुटुंबियांची सावंतवाडीचे युवा नेते विशाल परब यांनी भेट घेत सांत्वन केले. तालुक्यातील माजगाव कुंभारवाडा येथील रुपेश पाटकर (वय 32) या युवकाचे अपघाती निधन झाले.याची माहिती मिळताच युवा नेते विशाल परब यांनी त्यांच्या घरी भेट देत पाटकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. मुंबई -गोवा जुना महामार्ग कोलगाव येथे त्याच्या दुचाकीचा अपघात होऊन निधन झाले.

यावेळी त्यांच्यासोबत माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेंकर ,माजगावचे माजी सरपंच दिनेश सावंत, चराठा उपसरपंच अमित परब, केतन आजगावकर, अमय पै, आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page