उद्योजक राजन परुळेकर यांनी आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश…!

मालवण | प्रतिनिधी :

मालवण येथील उद्योजक राजन परुळेकर, यांसह सहकारी यांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
दरम्यान, राजन परुळेकर यांना मालवण उपशहरप्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी परुळेकर यांना नियुक्तीपत्र दिले.

यावेळी जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, जिल्हा प्रवक्ते राजा गांवकर, शहरप्रमुख दिपक पाटकर, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रवेशकर्ते राजन परुळेकर यांसोबत उद्योजक संतोष शिरगांवकर, सनी परुळेकर, संजय परुळेकर, संतोष शिरगांवकर, जेम्स डायस, रॉकी डिसोजा, ऑलविन फर्नांडिस, फ्रँकी डिसोजा, बाबू मोरजकर यावेळी उपस्थित होते. याबाबत माहिती मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर यांनी दिली.

You cannot copy content of this page