⚡बांदा ता.०९-: अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई यांच्यावतीने लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सुंदर हस्ताक्षर शालेय स्पर्धेत येथील खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कुल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी काव्या चव्हाण हिने सलग दुसऱ्या वर्षी राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
या स्पर्धेत राज्यभरातून २३२ विद्यार्थी सहभागी झाले होते. काव्या हिने शालेय गटात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळविला आहे. यापूर्वी देखील तिने विविध निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा, रंगभरण अशा विविध तालुकास्तरीय जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून पारितोषिके मिळविली आहेत.
तिला या स्पर्धेसाठी आई वडिलांचे व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. प्रशाळेचे मुख्याध्यापक नंदू नाईक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी काव्याचे अभिनंदन केले आहे.
फोटो:-
काव्या चव्हाण.