क्रांती वीर दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्या स्मृती चिरंतर राहण्यासाठी आचरे गावच्या मुख्य रस्त्याला हुतात्मा कोयंडे यांचे नाव द्या…

सुरेश ठाकूर:क्रांती दिनानिमित्त पिरावाडी येथे हुतात्म्यांना वंदन..

मालवण दि प्रतिनिधी
पिरावाडी ही वीरांची भूमी असून तीचे नाव पिरावाडी ऐवजी विरवाडी असे हवे होते. या एकाच वाडीने देशाला तेरा हुतात्मा दिले आहेत ज्या वीराच्या हुताम्यावर महात्मा गांधींनी अग्रलेख लिहीला असा हुतात्मा दताराम भाऊ कोयंडे या आचरा गावचा सुपुत्र हि आमच्या साठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या स्मृती आचरा वासियांसाठी प्रेरणादाई आहेत.त्या चिरंतर राहण्यासाठी आचरे गावातील मुख्य रस्त्याला दताराम भाऊ कोयंडे यांचे नाव द्यावे असे उदगार साहित्यिक अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे मालवण तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी पिरावाडी येथे काढले.
क्रांती दिनानिमित्त पिरावाडी येथे प्रभात फेरी काढत हुतात्मा दताराम भाऊ कोयंडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून क्रांतीवीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी त्यांच्या सोबत ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष नारायण कुबल, उपाध्यक्ष मंदार खोबरेकर, वैभव कुमठेकर जि प शाळा पिरावाडी चे मुख्याध्यापक सुभाष नाटेकर ,पिरावाडी हायस्कूल मुख्या रणजित बुगडे डॉप्रमोद कोळंबकर, गिरीधर सारंग पोलीस हवालदार बबन पडवळ ग्रापसदस्य पुर्वा तारी पोलीस पाटील तन्वी जोशी,जगन्नाथ जोशी, नित्यानंद तळवडकर निवृती जोशी सुरेंद्र कुबल आदिसह पिरावाडी ग्रामस्थ जि प शाळा व हायस्कूल ची मुले व शिक्षकवृंद उपस्थित होते
यावेळी पिरावाडी येथील हुतात्मा दताराम भाऊ कोयंडे यांच्या घरी जावून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच गावात प्रभात फेरी काढण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार जय कुबल यांनी केले

You cannot copy content of this page