सिंधुदुर्ग जिल्ह्यत सुरू असलेल्या अवैध धंद्यांना सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद…

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा आरोप..

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मटका, जुगार, ड्रग्ज, गांजा, अवैध दारू विक्री जोरात सुरू असून त्याला सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची टीका शिवसेना उबाठाचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. आनंदाचा शिधा वाटण्याबाबत शासनाकडून कोणतीच हालचाल केली नाही. उद्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संपल्यावर लाडकी बहीण योजना सुद्धा बंद करतील. स्वतःचा फोटो पॅकिंगवर छापून आनंदाचा शिधा आता गणेशचतुर्थीला मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्याचप्रमाणे आता लाडकी बहीण सुद्धा बंद होईल. शासनाकडे ठेकेदारांचे देय असलेले 500 कोटींचे बिल देण्यासाठी निधी नाही आहे. पालकमंत्री नितेश राणेंनी चतुर्थीपूर्वी खड्डेमुक्त रस्ता बनविण्याची घोषणा केली आहे. पण ते कशाने बुजविणार हे सांगितले नाही. आजवर पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्गात गणेश चतुर्थी पूर्वी रस्त्यांची पाहणी करण्याचा फार्स केला. तसेच सध्याचे पालकमंत्री नितेश राणे करत आहेत.

मुंबई गोवा नॅशनल हायवेवर पडत असलेले भले मोठे खड्डे प्लेवर ब्लॉकने बुजविले जात आहेत. नॅशनल हायवेचे खड्डे बुजविण्यासाठी प्लेवर ब्लॉक वापरावे लागणे ही सिंधुदुर्गवासीयांची शोकांतिका आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात 87 डॉक्टर पदे भरल्याचे पालकमंत्री सांगत असले तरी हे सर्व डॉक्टर हे शिकाऊ आहेत. रोरो कार सेवा आणि बोटीने कार वाहतुकीची सेवा दिली तरी जनतेचे मूलभूत प्रश्न प्रलंबितच आहेत. जिल्ह्यात मटका, जुगार, गांजा, ड्रग्ज, अवैध दारू विक्री जोरात सुरू असून त्याला सत्ताधाऱ्यांचे अभय असल्याची टीका माजी आमदार उपरकर यांनी केली.

You cannot copy content of this page