युवा मोर्चाच्या वतीने प्रत्येक तालुक्यात मोटारसायकल रॅली आयोजन – संदीप गावडे..
कणकवली : भाजपा जिल्हा तिरंगा यात्रा संयोजक संदीप गावडे यांनी गुरुवारी कणकवली येथे युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक केली. यादरम्यान बैठकीत
तिरंगा यात्रा संदर्भात माहिती दिली.
यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी प्रत्येक तालुक्यात युवा मोर्चावतीने मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस पपू पुजारे, तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी, तालुका चिटणीस समीर प्रभूगावकर, शहराध्यक्ष सागर राणे, उपाध्यक्ष प्रश्नात राणे, तेजस लोकरे, सचिन खोचरे उपस्थित होते.