राखी बांधून “व्यसनमुक्तीशी बंधन – व्यसनांपासून रक्षण’ या अभिनव अभियानाची सुरुवात…

सिंधुदुर्ग – रक्षाबंधन या उत्सवाचा गाभा रक्षण करणाऱ्यांना अभिवादन करणे आभार व्यक्त करणे आहे. रक्षाबंधन या उत्सवामध्ये एक प्रकारची बांधिलकी असून नशाबंदी मंडळाला ही बांधिलकी मंत्री महोदयांकडून अभिप्रेत आहे. व्यसनमुक्तीशी बंधन म्हणजे समाजाचे व्यसनांपासून रक्षण करणे होय ! असे रक्षण मंत्री महोदय मान्यवरांकडून व्हावे याकरिता नशाबंदी मंडळाच्या वतीने मंत्रालयात विविध खात्यांच्या मंत्र्यांना व्यसनमुक्तीची राखी बांधून समाजाचे व्यसनांपासून रक्षण करून महाराष्ट्रामध्ये नशा मुक्त महाराष्ट्राच्या धोरणाची अंमलबजावणी करावी, अशी विनंती नशाबंदी मंडळाच्या कोकण विभागाच्या वतीने व्यसनमुक्तीशी बंधन – व्यसनांपासून रक्षण असा संदेश देणाऱ्या राख्या बांधण्यात आल्या.

या कार्यक्रमात नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर , रायगड ठाणे रविंद्र गुरचळ, पालघर मिलिंद पाटील, मुंबई शहर चेतना सावंत, मुंबई उपनगर दिशा कळंबे या कोकण विभागातील व्यसनमुक्ती वर कार्य करणाऱ्या संघटकांचा समावेश होता.

या सर्व संघटकांनी मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना वाढत्या व्यसनांना आळा घालून समाजाचे रक्षण करावे, रक्षाबंधनच्या निमित्ताने व्यसनमुक्तीची राखी बांधून अनोखी भेट मागितली.

तसेच सिंधुदुर्गाचे पालकमंत्री मत्स्योद्योग व बंदर मंत्री ना. नितेश राणे यांनाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील जनतेचे व्यसनांपासून रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारून सिंधुदुर्ग जिल्हा नशा मुक्त करावा, अशी विनंती नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर आणि कोकण विभागातील संघटकांच्या वतीने करण्यात आली.

तसेच राज्यमंत्री नगर विकास, परिवहन ,सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास, औकाफ च्या माधुरी मिसाळ यांना आणि भा.प्र.से. सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे हर्षदीप कांबळे यांनाही व्यसनमुक्तीची राखी बांधून व्यसनमुक्तीच्या कार्याला न्याय देऊन सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली.

You cannot copy content of this page