चौके सम्यकनगरच्या रहिवासी सौ.आनंदी अनंत चौकेकर (६०) यांचे गुरुवार दि २२ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने उपचार सुरू असताना गोवा बांबुळी येथे निधन झाले.

त्यांच्यावर चौके येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . आनंदी चौकेकर या चौके ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या तसेच भारतीय बौद्ध महासभा आणि जागृती महिला मंडळाच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या.. त्यांच्या पश्चात पती, विवाहित मुलगी, जावई, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे
चौके येथील ट्रक चालक अनंत बाबाजी चौकेकर यांच्या त्या पत्नी तर सुवर्णा सुधीर तेंडोलकर यांच्या आई होत.
