सावंतवाडी ता. २३ : सावंतवाडी नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील महिला बचत गटांना दिवाळी फराळ विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महिला बचत गटांना त्यांच्या घरगुती खाद्यपदार्थांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच त्यांच्या आर्थिक उत्पन्नाला चालना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला बचत गटांनी लवकरात लवकर सावंतवाडी नगर परिषद कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन नगराध्यक्ष श्रद्धा भोसले, उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, उपसभापती सुनीता पेडणेकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, उद्यान सभापती शर्वरी मडगावकर तसेच नगरसेवक प्रतीक बांदेकर, सिद्धार्थ भांबुरे, नगरसेविका दुलारी रांगणेकर, नीलम नाईक, सुकन्या टोपले व वीणा जाधव यांनी केले आहे. इच्छुक महिला बचत गटांनी नगर परिषद कार्यालयातील लिपिक श्रीम परवीन शेख यांच्याशी संपर्क साधावा, असेही नगर परिषद प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.”
