Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी आगारातून उद्यापासून लांब पल्ल्याच्या अजूनही बसफेऱ्या सुरू

आगार प्रमुख वैभव पडोळे यांची प्रसिद्धीपत्रकातून माहिती *⚡सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी आगारातून उद्यापासून लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील अजूनही काही बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली. पडोळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील बसफेऱ्या उद्या सोमवारपासून सुरू करण्यात येत आहेत. या बस फेऱ्यांमध्ये सावंतवाडी…

Read Full News

राज्यकर्त्यांनी नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा इशारा *⚡मालवण ता.०१-:* मालवण शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य प्रशासनाकडून लस पुरवठा कमी होत असून मालवणात आरोग्य यंत्रणेतील अधिकारीच आपल्या मर्जीतील लोकांची नावे लसीकरणच्या यादीत घुसडवून लस देत असल्याने अनेक तास रांगेत तिष्ठत उभे राहणारे नागरिक लस घेण्यापासून वंचित राहत आहेत याबाबत राज्यकर्ते सुशेगात असून नगरपालिकेचेही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड…

Read Full News

बांदा- इन्सुली येथे पूरग्रस्तांना धान्य व मेडिकल कीटचे वाटप

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व चांदिवली सेवा समिती ट्रस्टचा पुढाकार ⚡बांदा दि.०१-:* बांदा इन्सुली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व चांदिवली सेवा समिती ट्रस्ट यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना धान्य व मेडिकल कीटचे वाटप करण्यात आले. संपर्क अध्यक्ष सागर तुळसकर यांच्या पुढाकारातून देण्यात आले.यात तांदूळ तूरडाळ साखर चहा पावडर साबण कोलगेट मीठ तेल बिस्किटं आदी साहित्य होते. यावेळी संपर्क…

Read Full News

पूरग्रस्तांना दिला मदतीतून ’आधार’

आधार ग्रुपचा सेवाभावी उपक्रम; पूरग्रस्तांनी मानले सदस्यांचे आभार *⚡कणकवली ता.०१-:* बांद्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका साईमंदिर येथील राकेश केसरकर यांच्यासह 20 कुटुंबीयांना बसला होता. या पूरग्रस्तांना आधार गु्रप टेंबवाडीतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन मदतीचा आधार दिला. यावेळी वैभव मालंडकर, नयन यादव, बाळकृष्ण यादव, दिनेश पेडणेकर, विशाल पेडणेकर, किशोर घुरसाळे, महेंद्र सावंत, विक्रांत सावंत, आतिश कांदळकर, सोमनाथ…

Read Full News

कारीवडे गावातील 12 कोरोना बाधित कुटूंबियांना मदतीचा हात

मंगेश तळवणेकर यांनी केले जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप *⚡सावंतवाडी ता.०१-:* कारीवडे गावात १२ कुटुंबे कोरोना बाधित आढळल्याने सध्या विलगिकरणात आहेत,हे लक्षात घेत माजी जि.प.शिक्षण आरोग्य सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री.मंगेश तळवणेकर यांच्या कडून खारीचा वाटा म्हणून आज त्यांना साखर, तूरडाळ, वाटाणे, तेल,चहापावडर, इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.संबंधित कुटुंबायांनी याबद्दल श्री.तळवणेकरांचे आभार…

Read Full News

माध्यमिक विद्यामंदिर कनेडीला वह्या प्रदान

*⚡कणकवली दि.०१-:* भिरवंडे (परतकाम वाडी) गावचे सुपुत्र, माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व ज्युनियर कॉलेज कनेडी चे माजी विद्यार्थी, लकी जनरल स्टोअर्स कनेडी चे मालक तसेच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे गणेश शांताराम खांबल यांनी कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. एम्. एम्. सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम…

Read Full News

विलवडे पूरग्रस्ताना विरार घरगुती खाद्य वस्तूंचे वाटप

विरार येथील श्री स्वामी समर्थ फाउंडेशनचा उपक्रम वैभववाडी प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ फाऊंडेशन विरार यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील , सावंतवाडी तालुक्यातील विलवडे या गावी पुराच्या पाण्यामध्ये झालेल्या नुकसान ग्रस्तांना घरगुती खांदे वस्तुची मदत करण्यात आली. यावेळी श्री स्वामी समर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष गुरूनाथ डांगे, कार्याध्यक्ष शिवराम तळेकर, उपाध्यक्ष गोपाळ दळवी, सचिव सखाराम सावंत, सहसचिव महेश परब,…

Read Full News

लायन्स क्लबमध्ये कुटुंब माणून काम करावे

ओंकार फडके यांचे पदग्रहण वेळी प्रतिपादन मालवण दि प्रतिनिधी एखाद्या संस्थेत काम करताना प्रत्येकाने सकारात्मक विचार ठेवून जबाबदारीने, प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करणे गरजेचे असते. लायन्स क्लब हा मोठा समूह असून या सामाजिक संस्थेत सदस्यांनी एक कुटुंब म्हणून काम करावे. लायन्सच्या सदस्यांनी जबाबदारी स्वीकारून समाजासाठी काम करावे, असे प्रतिपादन लायन्स क्लबचे…

Read Full News

सावंतवाडी राष्ट्रीय अदालतीत १२ लाख ६८ हजाराची प्रकरणे निकाली

*⚡सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी तालुक्यातील दिवाणी व फौजदारी प्रकरणासह ग्रामपंचायत पाणीपट्टी घरपट्टी वसुली प्रकरणातील सुमारे १२ लाख ६८ हजार ७५५ रुपये वसुलीचा निर्णय आज राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये झाला. सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक अदालतीचे तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर आर बेडगकर यांच्या हस्ते…

Read Full News

सांवतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १७ रुग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी तालुक्यात आज १७ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ७ तर ग्रामीण भागात १० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात भटवाडी ४, सबनीस वाडा १, सालई वाडा २ तर ग्रामीण भागात कोल गाव ३, मळगाव २, आरोंदा १, कवठणी १, इन्सुली २,…

Read Full News

You cannot copy content of this page