सांवतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १७ रुग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी तालुक्यात आज १७ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ७ तर ग्रामीण भागात १० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात भटवाडी ४, सबनीस वाडा १, सालई वाडा २ तर ग्रामीण भागात कोल गाव ३, मळगाव २, आरोंदा १, कवठणी १, इन्सुली २, चराठा १ असे रुग्ण सापडले असून सद्य स्थितीत तालुक्यात १७६ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page