सावंतवाडी राष्ट्रीय अदालतीत १२ लाख ६८ हजाराची प्रकरणे निकाली

*⚡सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी तालुक्यातील दिवाणी व फौजदारी प्रकरणासह ग्रामपंचायत पाणीपट्टी घरपट्टी वसुली प्रकरणातील सुमारे १२ लाख ६८ हजार ७५५ रुपये वसुलीचा निर्णय आज राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये झाला. सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक अदालतीचे तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर आर बेडगकर यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी अँड पी डी देसाई, अँड स्वप्नील कोलगावकर, श्री. भिसे व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. आजच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. बँकेची ४०७ प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यातील ११ प्रकरणांचा निकाल लागून सहा लाख ७५ हजार एकशे वीस रुपये वसुलीचा निर्णय झाला. ग्रामपंचायत घरपट्टी वसुलीची ७९१ प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यातील १११ प्रकरणी निर्णय होऊन दोन लाख ६६ हजार ९८४ रुपये वसुलीचा निर्णय झाला. ग्रामपंचायत पाणीपट्टी वसुलीची १२७ प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यातील ४५ निकाली लागली त्यातील ९ लाख ९८ हजार ४८५ रुपये वसुलीचा निर्णय झाला. पेंडिंग प्रकरणा पैकी दिवाणी २०४ पैकी २ प्रकरणे निकाली झाली. फौजदारी मध्ये १३५ पैकी ३६ निकाली झाली. फौजदारी मधील १३५ प्रकरणातील चेक्स बाॅन्स प्रकरणात ६ प्रकरणी निर्णय घेतला,त्यात दोन लाख ५५ हजार ७७० वसूलीचा निर्णय झाला व पार्टी केस २९५ निकाली होऊन १४५०० मिळून २ लाख ७० हजार २७० रुपये वसूल निर्णय झाला या सर्व प्रकरणात बॅंक, पाणीपट्टी, घरपट्टी अशा सर्व प्रकरणात १२ लाख ६८ हजार ७५५ रुपये वसूलीचा निर्णय झाला आहे. सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष, दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर आर बेडगकर यांनी राष्ट्रीय लोकअदालत मध्ये जास्तीत जास्त निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतला.यासाठी न्यायालयातील कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.

You cannot copy content of this page