लायन्स क्लबमध्ये कुटुंब माणून काम करावे

ओंकार फडके यांचे पदग्रहण वेळी प्रतिपादन

मालवण दि प्रतिनिधी एखाद्या संस्थेत काम करताना प्रत्येकाने सकारात्मक विचार ठेवून जबाबदारीने, प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करणे गरजेचे असते. लायन्स क्लब हा मोठा समूह असून या सामाजिक संस्थेत सदस्यांनी एक कुटुंब म्हणून काम करावे. लायन्सच्या सदस्यांनी जबाबदारी स्वीकारून समाजासाठी काम करावे, असे प्रतिपादन लायन्स क्लबचे शपथ प्रदान अधिकारी ला. श्री. ओंकार फडके यांनी लायन्स क्लब मालवणच्या पदग्रहण व शपथविधी समारंभात बोलताना केले. लायन्स क्लब मालवणच्या नूतन संचालक मंडळाचा पदग्रहण व शपथविधी समारंभ शपथ प्रदान अधिकारी ला. श्री. ओंकार फडके यांच्या अध्यक्षतेखाली मालवण येथील दैवज्ञ भवनमध्ये आज रविवारी संपन्न झाला. प्रारंभी ओंकार फडके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर झोन चेअरमन ला. अशोक देसाई, मावळते अध्यक्ष ला. विराज आचरेकर, नूतन अध्यक्ष ला.विश्वास गावकर, नूतन सचिव ला. सौ. जयश्री हडकर, नूतन खजिनदार ला.सौ. अनुष्का चव्हाण ला. गणेश प्रभुलीकर,ला. रुजारीओ पिंटो सौ वैशाली गावकर आदी उपस्थित होते. यावेळी ओंकार फडके यांनी नूतन अध्यक्ष विश्वास गावकर, सचिव सौ. जयश्री हडकर, खजिनदार सौ. अनुष्का चव्हाण, सहसचिव सोनाली पाटकर, सहखजिनदार सौ. दीक्षा गावकर यांच्यासह संचालक मंडळातील नूतन पदाधिकाऱ्यांना पदाची शपथ देत त्यांच्याकडे पदभार सोपविला. तर लायन्स क्लब मध्ये दाखल झालेल्या नवीन सदस्यांना देखील शपथ देण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष विराज आचरेकर यांनी वर्षभरातील कामाची माहिती दिली. यावेळी झोन चेअरमन अशोक देसाई यांनीही मालवण लायन्स क्लबच्या कार्याचे कौतुक केले. नूतन अध्यक्ष विश्वास गावकर म्हणाले, यापूर्वी सचिव म्हणून काम करताना सर्वांचे सहकार्य मिळाले, त्यातूनच आपण सर्व जबाबदाऱ्या उत्तमरीतीने पार पाडू शकलो. आता अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी अधिक वाढली असून तन, मन धन अर्पून सर्व सदस्यांच्या सहकार्याने संस्थेमार्फत समाजासाठी काम करू, असेही गावकर म्हणाले. यावेळी जयश्री हडकर व अनुष्का चव्हाण यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी लायन्स क्लब मधील सदस्यांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला. तसेच जास्त वर्षे क्लब मध्ये काम करणाऱ्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय घाटवळ, गणेश प्रभुलीकर यांनी केले. तर आभार जयश्री हडकर यांनी मानले. यावेळी लायन्स क्लबचे महेश अंधारी, रुजरिओ पिंटो, राजा शंकरदास, उमेश शिरोडकर, अवधूत चव्हाण, अरविंद सराफ, महेश कारेकर, मुकेश बावकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, उमेश शिरोडकर, नाना साईल, सौ. वैशाली शंकरदास, सौ. मीना घुर्ये, सौ. वैशाली गावकर, सौ. अंजली आचरेकर, सौ. राधिका मोंडकर, रूपा कांदळगावकर, स्नेहा जामसंडेकर, रत्नागिरीचे आपा वळंजू, सावंतवाडीचे श्री. स्वार आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page