विलवडे पूरग्रस्ताना विरार घरगुती खाद्य वस्तूंचे वाटप

विरार येथील श्री स्वामी समर्थ फाउंडेशनचा उपक्रम

वैभववाडी प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ फाऊंडेशन विरार यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील , सावंतवाडी तालुक्यातील विलवडे या गावी पुराच्या पाण्यामध्ये झालेल्या नुकसान ग्रस्तांना घरगुती खांदे वस्तुची मदत करण्यात आली. यावेळी श्री स्वामी समर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष गुरूनाथ डांगे, कार्याध्यक्ष शिवराम तळेकर, उपाध्यक्ष गोपाळ दळवी, सचिव सखाराम सावंत, सहसचिव महेश परब, सदस्य निलेश शिवगण,विजय चव्हाण, प्रकाश परब, दिपेश हरयाण, संजय गुरव,अजय परब,विवेक सावंत, संदेश डांगे, विनोद सुर्यवंशी आदी उपस्थित होते. यांच्या मार्फत नुकसान ग्रस्त ग्रामस्थांना घरगुती वस्तू तांदूळ,डाळ,मुग,तेल, साबण,आदी वस्तूचे किट करुन संघटनेचे पदाधिकारी स्वता उपस्थित राहुन ग्रामस्थांना मदत केले

You cannot copy content of this page